PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024   

PostImage

गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार


 

 

आठ महिने उलटूनही आरोपीला अटक नाही

 

• मुंबई, (वा.) कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिला गेल्या आठ महिन्यांपासून पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत असूनही तिला न्याय मिळत नसल्याची घटना समोर आली आहे. पोलिस आरोपीला अटक करण्याचे धाडस का दाखवू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पॉर्न फिल्म्समध्ये काम करणारा अभिनेता गौरव सिंग राजपूत (२८) याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीवर त्याच्या ३४ वर्षीय सह-अभिनेत्रीवर शूटिंगदरम्यान कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला असा या अभिनेत्रीचा आरोप आहे. पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार करून आठ महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही.

 

राजस्थानमध्ये गुन्हा या संदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस

 

निरीक्षक गणेश गायके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपीने या अभिनेत्रीसोबत राजस्थानमध्ये हा गुन्हा केला आहे. आम्ही एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजस्थान पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024   

PostImage

लिव्ह-इन पार्टनरची हत्या; भावाच्या बायकोसोबतच संबंध


 

मुंबईः दारुच्या नशेत एका व्यक्तीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला पनवेल येथून अटक केली आहे. या व्यक्तीची लिव्ह इन पार्टनर ही त्याच्याच मोठ्या भावाची बायको असल्याची माहिती आहे, जो आता या जगात नाही. २००८ मध्ये हा आरोपी आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणात तुरुंगात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो त्याच्या विधवा बहिनीसोबत राहू लागला, अशी माहिती आहे. कमल्या रागो निरगुडा असे आरोपीचे नाव असून त्याला - पनवेल तालुका पोलिसांनी

 

मंगळवारी रात्री हत्येनंतर अटक् केली आहे. पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ज्य ठिकाणी ही घटना घडली त्या टॉवर वाडीतील पोलिस पाटील यांनी आम्हाला सांगितले की एक महिलेवर तिच्या लिव्ह इन पार्टनरने हल्ला केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे.

 

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी निरगुडा ह तिथेच होता. तर, ज्यांच्यावर हल्ल झाला त्या शनिवारी गोमा निरगुड या जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं .

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024   

PostImage

पतीच्या आत्महत्येनंतर ११ महिन्यांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल


 

• मुंबई, (वा.) आत्महत्येच्या अकरा महिन्यांनंतर MHB पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरी उर्फ आयुषी चेतन मुसले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पती चेतनवर मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे. चेतनच्या डायरीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस लवकरच गौरीचा जबाब नोंदवणार आहेत.

 

वास्तविक, २९ ऑगस्ट २०२३ रोजी चेतनने बोरिवली पश्चिम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यादरम्यान कौटुंबिक वादातून नैराश्येतून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला होता.

 

मात्र नुकतीच मृत चेतनच्या आईला एक डायरी सापडली. ज्यामध्ये चेतनने पत्नी गौरी उर्फ आयुषीबद्दल लिहिले होते. ती त्याचा मानसिक छळ करत असल्याचे डायरीत लिहिले होते. याला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला गौरी उर्फ आयुषी जबाबदार असल्याचे डायरीत लिहिले होते. त्यामुळे मृताच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरीविरुद्ध पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन त्या महिलाचे अजून कोणी साथीदार आहेत ते तपासून पाहणार असल्याचे सुत्रांकडून समजते

 

.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द


मुंबई : एका महिला न्यायिक अधिकाऱ्याने तिच्या पती व सासरच्याविरोधात क्रूरता व अन्य दाखल केलेले गुन्हे शुक्रवारी रद्द केले. अधिकारी महिलेने वैवाहिक वादातून गुन्हा दाखल केल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

 

संबंधित अधिकारी महिलेने गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. तसेच वर्णन केलेल्या घटना आणि दाखल केलेला गुन्ह्याचा ताळमेळ नाही. सासरच्यांनी गुन्हा दाखल केला म्हणून अधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली, असे निरीक्षण न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्याखंडपीठाने नोंदविले.

 

 गुन्हा रद्द करण्यासाठी अधिकारी महिलेचा पती व सासरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित महिलेचा २०१८ मध्ये विवाह झाला. मॅट्रिमोनिअल साईटवरून त्यांचा विवाह जुळला. पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका अद्याप प्रलंबित आहे.

 

न्यायिक अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आणि दीर जबरदस्तीने त्यांच्या चेंबरमध्ये घुसले आणि समझोत्याने घटस्फोट घेत आहोत, असे नमूद केलेल्या घटस्फोट याचिकेवर जबरदस्तीने सही घेतली. तेच कृत्य सासरच्या अन्य मंडळींनी त्याच दिवशी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पतीसह सासरच्या अन्य मंडळींवर आयपीएसच्या काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी पतीसह सासरच्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

 

सकाळच्या सत्रात तक्रारदाराला त्यांचे 3 कर्तव्य पार पाडण्यास त्यांचे पती व दीर याने अडथळा निर्माण केल्याचे दर्शविणारे ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

 

सासरचे चेंबरबाहेर वाट 3 पाहात होते आणि तक्रारदार स्वतःहून चेंबरच्या बाहेर आल्या. त्यामुळे त्यांना कर्तव्य पार पाडण्यास सासरच्यांनी अडथळा निर्माण केला, हा गुन्हा दाखल करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने पती व सासरच्या मंडळींवरील गुन्हा रद्द केला.

 

 


PostImage

pran

Feb. 10, 2024   

PostImage

उद्धव ठाकरे गटनेते अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह करून हत्या, …


अभिषेक घोसाळकर शॉट: अभिषेक घोसाळकर हा शिवसेना (यूबीटी) नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. अभिषेक हा माजी नगरसेवक आहे. ही घटना मुंबईतील दहिसर भागात घडली आहे. पोलीस घटनास्थळी हजर आहेत.

 

महाराष्ट्र क्राईम न्यूज : मुंबईत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी मुंबईतील दहिसर परिसरात उद्धव ठाकरे गटनेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याला तीन गोळ्या लागल्या, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी अभिषेकच्या मृत्यूला दुजोरा दिला. आरोपी मॉरिस भाईने आधी अभिषेकसोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या. गुन्हा केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते असून अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पुत्र आहेत. अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक होते.

 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

 

 या घटनेवर शिवसेनेने (यूबीटी) म्हटले की, महाराष्ट्रात 'गुंडाराज' आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, अशोक त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते आणि आता त्यांच्यावर गोळी झाडल्याची बातमी आली आहे. राज्यात काय चालले आहे? इथे गुंडांचे सरकार आहे.

 

यापूर्वी अभिषेकने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

 

 मॉरिस भाई म्हणून ओळखला जात होता आणि तो स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवत होता. वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर याने दहिसर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आरोपीच्या कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेने दहिसर परिसरात वातावरण तापले असून येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

 

 काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या एका नेत्यावर गोळीबार केला होता. कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी २ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात स्थानिक शिवसेना नेते महेश गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर आमदार आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांचा मुलगा वैभव, गणात्रा आणि अन्य आरोपी नागेश बडेकर फरार आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024   

PostImage

विश्वासाने मित्रांना मदत केली, त्यांनीच ६२ लाख रुपये हडपले


 मुंबई : व्यापाऱ्याच्या ६२ लाखांवर पैशावर विश्वासू मित्रानेच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

 

अंधेरीतील व्यावसायिक सुरेश पटेल यांचा रेडीमेड कपड्यांचा होलसेल व रिटेलचा व्यवसाय आहे. व्यावसायिक मित्रांनी त्यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी वैयक्तिक कामासाठी ४०

 

लाख रुपये कर्ज म्हणून घेतले. तसेच आणखी एक मित्राकडे वैयक्तिक महत्त्वाच्या कामासाठी २२ लाख ५० हजार रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांनी दोघांकडे पैसे परत मागितले. दोघांनी विश्वासू मित्र असलेल्या विनोद पटेलकडे पैसे देत तक्रारदार यांना देण्यास सांगितले. मात्र, काही वेळाने विनोदचा फोन बंद लागला. तो ६२ लाख रुपये घेऊन पसार झाल्याची खात्री पटताच पोलिसांत धाव घेतली.